डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कविता
बाबासाहेब होते ज्येष्ठ
दिले संविधान देशाला त्यांनी श्रेष्ठ
स्वातंत्र्य, समता, बंधुता
आणली देशांमध्ये
निरक्षरता दूर केली
जीवन ज्योत पेटवली लोकांमध्ये
ग्रंथ हेच गुरु
हीच शिकवण त्यांची
अस्पृश्यता नष्ट केली
दूरदृष्टीता त्यांची
निर्धनाना दिला आधार
सर्वांच्या हृदयात मिळविले स्थान
घायाळ पाखरांना पंख दिले
मुक्या वेदनाना शब्द दिले
युगायुगाच्या शोषितांच्या उद्धार केला
संविधान दिले देशाला
राज्यकारभार चालवण्या
सागराचे पाणी कधी आटणार नाही
भीमराया तुझी आठवण कधी मिटणार नाही