समई
समई
1 min
167
समई असते
प्रत्येकाच्या देव्हार्यात
मांगल्याचे प्रतीक
शुभ कार्यात पूजात
सरस्वती पूजन असो
कि गणपती स्थापना
असो कुठले उद्घाटन
देवीचे पुढे असते समईची
आस्थापना
समई असते मांगल्य
शुभ कार्याचा आरंभ
अंधाराला दूर सारून
पूजेसाठी असतो प्रारंभ
लक्ष्मीपूजन असो
की दसरा पाडवा छान
समई पेटताच
सणांचा होतो मान
समईच्या प्रकाशात
अंधार होतो दूर
जीवनात आशावादी
राहण्याचे स्वप्नांना येथे पूर