Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

शिक्षण हवं रं

शिक्षण हवं रं

1 min
433



*आम्हा शिक्षण हवं रं (2)*


भोग आमच्या नशिबाचं

भिक मागत जगायाचं

संपू दे आज सारं

शिक्षणाचं उघड दार

हक्क आमचा शिक्षणाचा मिळू द्या आम्हा


*शिक्षण हवं रं*

*आम्हा शिक्षण हवं रं*


ताई ,दादा ,मावशी, काका

पैशाची भिक देवू नका

शिक्षणाचा एक दिवा

आमच्या जीवनात लावा

अंधःकार अज्ञानाचा संपू दे जरा


*शिक्षण हवं रं*

*आम्हा शिक्षण हवं रं*


समाजातले आम्ही भिकारी

पोटासाठी फिरतो दारी

मदतीचा द्या एक हात

शिक्षणाची हीच सुरुवात

माणसाला माणुसकीची साथ द्या जरा


*शिक्षण हवं रं*

*आम्हा शिक्षण हवं रं*


Rate this content
Log in