STORYMIRROR

Manisha Awekar

Children

4  

Manisha Awekar

Children

शीर्षक रम्य ते बालपण

शीर्षक रम्य ते बालपण

1 min
453


बालपणीचा काळ सुखाचा

खेळ गप्पा गोष्टी रंगण्याचा

निर्व्याज मन निर्मळ गप्पा 

चिंचा बोरे आवळे खाण्याचा


हसू ओठावरी अल्लडसे

मन निर्मळ ते धवलसे

आगळीच दुनिया रमवे

जाण दुनियेची मुळी नसे


नसे शिरी ओझे अभ्यासाचे

हुंदडणेच माहित असे

मैत्रीची रीत आगळी असे

जिवश्चकंठश्च मित्र असे


गोष्टी चांदोबा परीराणीच्या

अल्लाउद्दीन जादूदिव्याच्या

गोष्टी ऐकता स्वप्नकथांच्या

रंग चढे नव कल्पितांच्या


निखळ आनंद बालपणी

आता उरल्या त्या आठवणी

गेले ते दिन गेले म्हणूनी

आठवांतचि जाते रमून


Rate this content
Log in