शीर्षक झिम्माड श्रावणसरी
शीर्षक झिम्माड श्रावणसरी


आला झिम्माड श्रावण
धारा सोनेरी गं सरी
ऊनपावसाचा खेळ
खुले वसुंधरेवरी (१)
रश्मी किरणांमधूनी
ऊन हळदुले झरे
अंबरात सप्तरंगी
इंद्रधनू गोफ सजे (२)
रिमझिम सरी येती
क्षणभरे थबकती
अभ्रांतूनी रविराज
हळूहळू डोकावती (३)
सरी पावसाच्या देती
मोद प्रेमिक जनांना
ऊन पावसात हर्ष
बिलगूनी भिजताना (४)
ऊन पावसाचा खेळ
वसुंधरा सुखावली
मुख लाजरे बावरे
स्वागतास सज्ज झाली (५)