शिदोरी
शिदोरी
ज्यांनी दिला मज
अखंड ज्ञानरुपी वसा
त्यांचा उल्लेख मी
चार शब्दात मांडू कसा
जन्म देऊनी झाली
माऊली पहिली गुरू
बोट धरून बाबांसोबत
झाला माझा प्रवास सुरू
प्रत्येक टप्याटप्यावर
भेटले मज अनंत शिक्षक
ज्यांनी बनविले मला माणसात
माणूस म्हणून जगण्या लायक
निसर्गाने ही शिकविले मज
नकळत खूप काही
खरतर जे मी कुठल्याच
पाठयपुस्तकात शिकले नाही
सर्वांनी दिली ज्ञानरुपी
आयुष्यभराची शिदोरी
त्यामुळेच मी ताठमानेने
जीवनाचा प्रवास करी
प्रत्येक गुरुची आठवणी रुपी
मनात कोरली गाथा
त्यांच्या चरणी सदैव
माझा झुकता राहो माथा
