STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational Tragedy

3.3  

Vijay Sanap

Inspirational Tragedy

शहीद जवान

शहीद जवान

1 min
8.8K


सण येता दिवाळीचा

माय काढी आठवण

बंधू महा सीमेवर

वाट पहाती बहीण ।।


माय करती रे फोन

नाही बेल ती वाजतं

येत हृदय भरून

नाही मन रे लागतं ।।


कसं सांगू आई तुला

नाही मिळाली गं सुट्टी

सीमेवर आज माझी

होती लागली दिवटी ।।


दुर देशी बाळ माझा

करी देशाचे रक्षाण

घाव वैऱ्याचे झेलता

आले वीराला मरण ।।


माय लावती पणत्या

बांधी दाराला तोरण

गाव सारं शोका मधी

तिला सांगनं रे कोण ।।


कशी घुसली रे गोळी

बाळा तुह्या काळजात

सण दिवाळीच्या दिशी

कसा झाला तुझा घात ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational