शेवटी मी रिताच उरलो
शेवटी मी रिताच उरलो
गमवून नाती आणि वेळ
सुखी आयुष्यासाठी धावलो
ना मिळालं सुख ना मिळाली शांती
शेवटी मी रिताच उरलो...
शेवटपर्यंत स्वार्थी राहून
माझं माझं करत राहिलो
हाती उरला मोठा शून्य
शेवटी मी रिताच उरलो...
ना कुटुंबाला वेळ दिला
ना स्वतःसाठी जगलो
पैसा कमवायच्या नादात सुख हरलो
शेवटी मी रिताच उरलो...
जर्जर झालं मन आता
म्हातारपणाकडे झुकलो
उरले फक्त आठवणींचे कळप
शेवटी मी रिताच उरलो...
आठवतो आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये
मी कोणासाठी जगलो
काहीच मिळवलं नाही मी
शेवटी मी रिताच उरलो...
