STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

3  

अमोल धों सुर्यवंशी

Inspirational

शेतकुंज जना..

शेतकुंज जना..

1 min
300

शेतीत काहीही मिळत.. नाही?

आई शेत विक आणि मुंबईला ये

नाही रे बाबा तू हे बोलण्यापेक्षा कधी डोक्याला टॉवेल बांधून, हातात खुरपं घेऊन,शेताच्या बांधावर येऊन बस तुला खूप काही मिळेल...

त्याच्या समोर तुझा पगार कमी पडेल...


शेतकुंज जना

सूर्याचं छप्पर डोईवर होतं

रिकाम्या झोळीत डोळ्यांतील आटलेले पाणी साजत...

चुलीवर भाकरी भाजते ते चटके कमी लागतात

तुझ्या बोलण्याने काळीज जळतं


तुझा बा बोला होता ते खर झालं,

तीन पोरांना सांभाळुन शेतात राबणं एका वाघिणीलाचं शोभतं..

मुंबईमध्ये भांडी गासून, लाली लिपस्टीक नको बाई

जिच्या कुशीत शांत झोप लागती तीच खरी काळी आई


तारण करून सावकाराकडे कर्ज काढलंय

मातीत उगवेल की करपेल हे नाय मी बघितलंय

विश्वास ज्यावर होता तो अर्ध्यावर सोडून गेला

तू मुंबईमध्ये जाऊन मोठा माणूस झाला


साथ देणारा फोटोत बसून भिंतीवर लटकला

तुला येणं होत नाय, तू मोबाईल पुरताच राहिला

संकट कमी आहेत माझ्या वाट्याला

नांगरलेली जमीन पाणी पाणी करून विधवा झाल्या 

इरिगेशनची  स्कीम पुढाऱ्यांनी वाटून खाल्या


बांगड्या नाहीत म्हणून का मनगटाची ताकद कमी झाल्या

चांगल्याला खूप चांगली, वाकड्यात गेला त्याचं कंबारडं मोडीन, हे सारं आई-बाबांकडून शिकून आल्या

उसाला भाव नाही मिळाला

पाणी पट्टी आणि शेतीकरा मध्ये निमा कापला

मी काही काळू दिले नाही तुला


आता जमीन विक असं बोलू नको 

"म्हणे शेतकुंज कुत्र्यांनी, उखारलेल्या उखीरड्याचे जगणं,"

हे जगणं तांडव आहे, यातून पुढे स्वर्ग मिळतो

पगारावर काम करणाऱ्यांना कसा नाय कळतो.?

मेलो की विक जमीन आता मला हिच्याबरोबर जगू दे...


शेतकुंज : आज्या, पणजाची, जहागिरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational