STORYMIRROR

Manda Khandare

Inspirational

3  

Manda Khandare

Inspirational

शेतकऱ्यांची आर्त हाक

शेतकऱ्यांची आर्त हाक

1 min
232

त्याच्या शुष्क डोळ्यातून

आता ढगफुटीच होणार होती

आभाळातील पावसाने

दडी जी मारली होती


आज येईल उद्या येईल म्हणून

उधारीच्या अवसानाने

वाट तो पाहत होता

अन् नांगरुन ठेवलेल्या शेताकडे

तो आशेनी पाहत होता


जवान पोरिचा बाप होणे

त्याच्या साठी शाप ठरत होता

म्हणून त्याही आता बाप पुढे जाण्याचे 

सहसा टाळत होत्या


घरची आब्रू झ।कण्या साठी

ती लुगड्याचे थिगडे करुण लावत होती

अन् रोजच रात्रि आपल्या फटक्या पदराने

चांदण ती झेलत होती


काय होईल कसे होईल

या प्रश्नांनी त्याच्या डोक्यात थैमान घातले होते

पण निराशेला अंकुर फुटून

तर त्याचे केव्हाच् वॄक्ष झ।ले होते


अपराधी पणाची भावना 

रोजच त्याच्या डोळ्यात सरसावत होती

अन् रोजच समोरच्या झ।डावर

त्याला लटकलेली त्याचीच प्रतिकृति दिसत होती


डोळ्यातील पाणी पुसत

तो देवाला म्हणत होता,

देवा, या माझ्या डोळ्यातील

पाण्याने शेती करता आली असती 

तर आज मझ्याही नावापुढे 

सावकार ही पदवी लागली असती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational