शेतकऱ्याची दशा
शेतकऱ्याची दशा
केला होता नवस मी
अबोला दगडाच्या देवाला
दया दाखव म्हणावं आमच्यावर
त्या लाफाट पावसाला
किती जीव घेणार आहेस
आमच्यासारख्या गरीबाचा
का? तुला हेवा वाटत नाही
आमच्या दशेचा
आरं कर्जाच्या वझ्यान आमचं
कंबार मोडून गेलं
सावकाराच गरदाड आम्ही
व्याजान र भरलं
दुःखाच्या डागण्या नशिबी
पाचवीला पूजलेलं दारिद्र्य
तोडका मोडका संसार
आणि कपड्यांना छिद्र
का? र राहतो उपाशी
सगळ्यांचं पोट भरणारा शेतकरी राजा
सगळी गरिबी त्याच्याच नशिबी
का? होती दलालांची मजा
