शेतकरी
शेतकरी
शेतकरी माझ्या
ऊठ पेटून आता
कर्ज अन् पिक ना म्हणून
आत्महत्या का करता
हात पाय सलामत
कोणत्याही कामासाठी
हतबल नको होऊस
पोचतो सर्वांना जगण्यासाठी
मुलं बाळांना आस तुझी
माया ममतेने वाढवलेले
वडीलधाऱ्या नावा बट्टा
लागू देणे वचन दिले
उठ जागा हो उद्याची
झुंजार हो प्रतिकार
आयुष्यात हार-जीत असे
घराचा स्तंभाला आधार
बस झाले रडगाणे
घरच्यांनी बघावे कुणाकडे
सत्य आणि मेहनतीची जोड
हत्येने पडो न पाऊल वाकडे
विद्रोह कर स्वतःशी
सोपें न आयुष्य जगणे
हिम्मत अन् धैर्य
मेहनत पिकेल यश जोमाने
