STORYMIRROR

Shreyash Shingre

Tragedy

5.0  

Shreyash Shingre

Tragedy

शेतकरी-एक उदास विराणी

शेतकरी-एक उदास विराणी

1 min
1.7K


ओसाड पडलेल्या शिवारामध्ये कष्टाचा घाम गाळतोय

तुमचं आमचं पोट भरण्यासाठी ऊनवाऱ्याशी झुंजतोय


स्वतःच्या पोटाला चिमटा काढून लेकरांचं पोट भरतोय

वैरण नाही जनावरांना म्हणून स्वतःला नांगराला जुंपतोय


शेतात पीक यावं म्हणून कधी घर गहाण ठेवतोय

सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी दिवसरात्र राबतोय


डोळ्यात आसवं जमा करून पावसाची वाट बघतोय

दुष्काळाशी सामना करताना कधी आतल्या आत हरतोय


आज ना उद्या पाऊस येईल या एका आशेवर जगतोय

भुईच्या पडलेल्या भेगा पाहून रोज थोडं थोडं मरतोय


शेतमालाला भाव नाही म्हणून पीक रस्त्यावरती फेकतोय

आपले हक्क मिळवण्यासाठी कधी संसदेवर मोर्चा काढतोय


शेतकऱ्याला किंमत नाही म्हणून मरून जातो म्हणतोय

आपल्यापाठी तरी कुटुंबाचं भलं होईल म्हणून फास लावून घेतोय


कसलीच योजना पोहचत नाही म्हणून आतल्या आत कुढतोय

काही होताना दिसत नाही शेवटी जीवनयात्रा संपवतोय



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy