STORYMIRROR

Shital Yadav

Drama Others

3.3  

Shital Yadav

Drama Others

शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी

1 min
18.1K


कष्ट करुनी शेतात

सोन्यावानी पीक येई

म्हणूनी शेतकरी हा

सर्वांचा पोशिंदा होई ।


घन ओथंबूनी येता

शीळ पाखरं घालिती

स्वप्न डोळ्यांत दिसती

दिवस सुखाचे येती ।


धारा घामाच्या वाहती

कळा कष्टाच्या सोसून

शेतमळा फुलवितो

उन्हं पाऊस झेलून


राजा सर्जाच्या जोडीनं

काळ्या मातीच्या कुशीत

करी पेरणी बीजांची

गाणी गाऊन खुशीत ।


धरीत्री हिरवीगार

आनंदात डोलताना

ऊर भरुनी येतसे

हे शिवार बघताना।


सोनं उगवण्यासाठी

लागे घोर मेहनत

कमाई कष्टाची हीच

शेतकऱ्याची दौलत ।


डोले धान्याचे कणीस

होई समाधानी मन

घरधनीण सौख्याने

साजरे करीती सण।


मिळे कष्टाने भाकरी

गोड चवीने लागती

पडक्या झोपडीतही

गणगोत विसावती।


शिवारात राबताना

विसरे आपले भान

जणू विठोबा चरणी

मांडियले असे ध्यान ।


निसर्ग देवता तुला

बळीराजाचे मागणे

फुलू दे माझं शिवार

फेड डोळ्यांचे पारणे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama