शब्दओंजळ
शब्दओंजळ
खूप खूप खूप दमून
रात्रीस झोपून गेले
स्वप्नांच्या रंगमहालात
छानच बाई रमले...
शब्दांची दुनियाच पाहिली
शब्दांची बाग दिसली
शब्दांना अलंकारांचे घोस
खूपच छान, छान भासली...
शब्द होते ते काही कठोर
तर काही अतीच मायाळू
समज द्यायलाही गोड शब्द
तर काही शब्द होते दयाळू....
अशा सर्व शिस्तीच्या शब्दांची
एक देखणी परडीच सजवली
जे शब्द मावले नाहीत परडीत
ते शब्दंची माळ ओंजळीत घेतली....
अचानक कुहू कूहु आवाज आला
स्वप्नांची शब्दमयी दुनिया जागी झाली
वसुधा अचानक भानावर आली
अन मस्त शब्द ओंजळीत हरवून गेली...