STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract Action Others

3  

Nandini Menjoge

Abstract Action Others

शब्द...

शब्द...

1 min
210

शब्द शब्दाचीच भिती

शब्दांचाच खेळ खुळा..

नित्य सल मनी भासतो

वैरी एक शब्द वेडा ||


खेळ कसा रचलेला

गुंफतो व्यर्थ वाद ..

दीर्घ तो घाव खोलवर

रूते गैरसमज मनावर ||


शब्दांची गोड प्रीत

प्रितीत जगते नाते..

घट्ट बंध रेशमी नात्यांचे

तेथे शब्द मन जिंकते ||


कडु शब्दांचे प्रयोग

जसे सर्पाचे दंश घायाळ..

शब्दांचा विवेक जेथे

व्यक्तीवर त्या जग घायाळ ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract