STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शब्द

शब्द

1 min
201

शब्द आहे मी खरंच नशीबवान

जे अंकित करतात ते भाग्यवान


शब्दांमधे अभिव्यक्ती सामर्थ्य 

शब्दांमधे दडलेला महान अर्थ


 शब्द व्यक्त करतात माया माणुसकी 

नकळत बरसतात प्रेम आपुलकी


सुखदुःखाच्या वेळी शब्द निःशब्द होतात

चक्षुधारातून झरझर अव्याहत वाहतात


नवकवी झगडतात मला जुळवण्यात

चपखल बसतो मी साहित्यिकांच्या कोषात


कधी मी प्रहार करतो तर कधी सावरतो

कधी मी जोडतो तर कधी मी तोडतो


परदेशवासियांचा मी भला मोठा पूल असतो

कानातील एक एक शब्द अंतरीचे आत्मे जोडतो


प्रेमात कळते शब्दावाचून सारे

पहिल्या रात्री व्यक्ततेचे झरे


शब्द नसते तर दुनिया झाली असती अबोल

परमेश्वराने लावला असता मनाला किती घोर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract