शब्द फुलता गित झाले...
शब्द फुलता गित झाले...
शब्द फुलता गित झाले
जाणिवेला अर्थ आले
ओथंबलेले हिरवे तुषार
सुखाचे ते थेंब झाले ...
वेचला एकांत माझा
सोबतीला भास झाले
मोहरूनी येता शहारी
गोड गुलाबी मीत झाले ...
सांगु नका कुणी प्रियाला
आठवांचे क्षण ओले
पापण्यांत दाटूनी येता
हळव्या मनाचे पिसारे बोले...
तु समोर मी स्तब्ध होते
पाश बाहूंचे वेडावूनी गेले
रात्र होती चांदण्यांची
काजव्यांनी डोळे मिटले ...
मोगरा गंधाळत होता
क्षण प्रितीचे विरघळले
पारिजात हसला दारी
कवडसे खिडकीतच थांबले ...

