शौर्याचे गुणगान
शौर्याचे गुणगान
तमा न करता जीवाची
लावतो बाजी प्राणाची.
धगधगती मशाल हाती
तेवतो ज्योत स्वातंत्र्याची..
घेवून मातृभुमीची आण
राखतो स्व देशाची शान.
रोखून तीक्ष्ण नजरेचा बाण
जपतो मायभुचा अभिमान..
आरामाचा करुनी बिमोड
क्षणोक्षणी राहतो तैनात.
आळस नसे कधी अंगात
देश रक्षणाचा ध्यास मनात..
होतो पारखा सणासुदीला
मुकतो कुटुंबातील आनंदाला.
देश संकटांवर घालून घाला
टाकतो परतवूनी दु:खाला..
असो बॉम्ब हल्ला वा तलवार
झेलतो तो बंदुकीचेही वार.
नाही मानत कधीही हार
करतो शत्रूंनाच बेजार..
सळसळते रक्त, उठतो पेटून
तळहातावर घेवूनी प्राण.
लढतो वीर सैनिक जवान
तिरंग्याचा राखण्या मान..
सलाम करते तुजला सैनिका
व्यर्थ ना होणार बलीदान
गुंजेल धरतीवर सन्मानाने
शौर्याचे मधुर गुणगान..
