शान तिरंग्याची
शान तिरंग्याची

1 min

352
तिरंगा प्रिय आम्हांला, सदासर्वकाळ
ध्वज नभी भारताचा, अनंतची काळ // ध्रु //
रक्त सांडिले भूमीत, स्वातंत्र्य योद्ध्यांनी
ध्वज उभारता होई, हत्याच गोळ्यांनी
आज डौलाने फडके, दिली प्राणमाळ (1)
आँलिंपिकमधी ध्वज, विजयी देशाचा
तिरंगा झळके तिथे, भारत देशाचा
झळकता नभी ध्वज, सफलता माळ (2)
तिरंगा लपेटून ये, वीरपुत्र घरी
रडतीच धायीधायी, दुःख दाटे उरी
मायबापांच्या आसवा, नसे मुळी खळ (3)
वीरमरण येता लाभे, पुण्य हो अपार
धडकता वार्ता नसे, शोका पारावार
मान तिरंग्याचा लाभे, जे जिंकिती काळ (4)