STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

4  

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

शाळेतील शिक्षक

शाळेतील शिक्षक

1 min
382

अथांगरूपी भरलेल्या समुद्राप्रमाणे

 तुडुंब भरलेला ज्ञानाचा सागर

शिक्षकरुपी भेटलेला देव माणूस

त्यांच्यापासूनच कळे शिक्षणाचा पाझंर


आई - वडिलांचे कर्तव्य

खडू - पाटी घेऊन देणे 

पण खडू म्हणजे काय शिकवणारे

ते शाळेतील पहिले शिक्षक


कधी गोड शब्दाने

तर कधी कठोर शिक्षेने

चांगल्या तत्त्वामध्ये आकार देणारे

ते म्हणजेच शाळेतील पहिले शिक्षक


खऱ्याखुऱ्या आयुष्यातील

अंधारलेल्या वाटेत

प्रकाश सोबत घेऊन येणारे

ते म्हणजेच शाळेतील शिक्षक


विविध विषयांचे ज्ञान देेताना

चूकीचे कोणती व बरोबर कोणती

गोष्टीचा बोध करून देणारे

ते म्हणजे शाळेतील शिक्षक


शिक्षक ही एक अशी व्यक्ती

त्याविना विद्यार्थी व शाळा अपुरी

असते जेव्हा शिक्षकाची साथ

तेव्हाा विद्यार्थीही करतो संकटांशी मात


#thankyouteacher


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational