शाळेतील मित्रांची पुनर्भेट
शाळेतील मित्रांची पुनर्भेट
शाळेतील मित्रांची पुनर्भेट
आठवली शाळा, आणि आठवले मित्र।
करायचो आम्ही शाळेत दंगा सर्वत्र॥
वर्गातली बाके आम्ही दणादण बडवायचो।
तबला त्यांचा करून हात साफ करुन घ्यायचो॥
शेवटच्या बाकावर बसण्याची वेगळीच मजा।
हलावे लागायचे कधीतरी, जर वर्गात झाली कोणाला सजा॥
पण एरव्ही ती आमचीच मक्तेदारी।
मी आणि माझे मित्र, आमचीच वतनदारी॥
पहिल्या रांगेतल्या पोरींच्या रिबिनी दिसायच्या लाल।
बाईंचा डोळा चुकवून , विमान उडवताना यायची भलतीच धम्माल॥
कधीमधी खावी लागायची सरांची छडी।
पण तेवढी होतीच आमची छाती निधडी॥
मस्त कल्ला केला आम्ही दहावीच्या वर्षी।
हेडसरांनी दटावले अनेकदा, लावली पुसायला बाके आणि फरशी॥
तरीही शाळा सोडताना डोळे पाणावले आमचे।
मित्र दुरावणार ह्याचे नव्हते दुःख; वाटले, आता बाक कोण वापरणार आमचे?॥
कंपास मधल्या यंत्रांनी, नावे कोरली ज्यावर।
पुन्हा कधी दिसतील का, ती बाके शाळा सोडल्यावर?॥
म्हणूनच आता जेव्हा आले शाळेचे निमंत्रण, जमलो सारे मित्र आम्ही शाळेच्या जुन्याच बाकांवर।
तोच केला कल्ला आम्ही, उंदाडलो जिवलग मित्रांसारखे; तीच दोस्तीची भावना बरसवली एकमेकांवर॥
