शाळा
शाळा
शाळा म्हणजे ज्ञानाची
निर्मळ निश्चळ पवित्र गंगा
आपणासारखीच करते माऊली
जो कोणी येईल तिच्या संगा
उच्च नीच भेद नसे
भेद ना कोण्या जातीचा
येथे नांदतो ज्ञानआनंद
त्यावर हक्क हर विद्यार्थ्याचा
माता सरस्वतीची प्रथम उपासना
मग माता महालक्ष्मी प्रसन्न करी
ज्ञानार्जनाने जो होतो परिपूर्ण
दोन्ही नांदती सौख्याने त्याच्या घरी
शाळा हे तर ज्ञानाचे मंदिर
तिमिरातून तेजाकडचा प्रवास
अ च्या अज्ञानापासून
ज्ञ च्या ज्ञानाचा हव्यास
शाळा ही तर माऊली
हे तर वाघिणीचे दूध नीरसं
जो पितो तो फोडतो डरकाळी
दूर सारतो हर अडथळा हमखास
नमो नमो हे नमो माते
माझी शाळा विद्यादेवते
तुझ्या मूळेच उज्ज्वल दिन आजचा
ज्ञानलौकिक आसमंती घुमवते