शिव
शिव

1 min

185
जन्म हाच अखेरचा
अखेरचा हा प्रवास
सत्य सुंदर शिवाचा
शिवाचा मजला ध्यास ।।१।।
रोखोनी आर्त मनाची
मनाची तीव्र भावना
सत्य सुंदर शिवाची
शिवाची मज कामना ।।२।।
भवसागर तारक
तारक हा अरिष्टांचा
सर्वसुख जो कारक
कारक मम सुखाचा ।।३।।
गंगाधारी तुम्ही शिव
शिव त्रिलोचनधारी
दुःख हर तुम्ही शिव
शिव अष्टभुजाधारी ।।४।।
ध्यानमुर्ती गजपिता
गजपिता सुखकारी
भोळेसांब ऊमापती
ऊमापती भवहारी ।।५।।
निलकंठ हे शंकर
शंकर ब्रम्हमुरारी
विष निर्दाळक तुम्ही
तुम्ही हो त्रिशूलधारी ।।६।।
भस्माधारी तुम्ही शिव
शिव सर्व सुखकर्ता
ॐ नमः शिवाय मंत्र
मंत्र सर्व दुःखहर्ता ।।७।।