STORYMIRROR

Sandip Todkar

Inspirational

4  

Sandip Todkar

Inspirational

दैवत रमाईपती

दैवत रमाईपती

1 min
383

बहुजणांचा करण्या उध्दार

धरेवर महामानव अवतरती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।१।।


दलितांचे सावरले जीवन

समजवूनी शिक्षणाची महती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।२।।


बँरिस्टरची घेतली पदवी

केली संविधानाची निर्मिती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।३।।


समता स्थापिली समाजात अन्

घडविली उपेक्षितांची उन्नती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।४।।


अनिष्ट रुढीप्रथांचे दहन करुनी

न्यायकारक केली समाजनिती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।५।।


भारतीय लोकशाहीस दिले संविधान

भक्कम केली जगी देश उन्नती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।६।।


समता स्थापन्या दलितांना आरक्षण

आरक्षित केली जणू बहुजण संपत्ती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।७।।


अनेक कायदे कल्याणकारी रचिले

कामगार अन् महिलांना रोजगार निर्मिती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।८।।


दलितांना उध्दारुन महापरिनिर्वाण केले

सहा डिसेंबर एकोणिसशे छप्पनला जगती

विद्यावाचस्पती भीमराव विद्यावाचस्पती

दैवत रमाईपती आमचे दैवत रमाईपती ।।९।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational