STORYMIRROR

Sandip Todkar

Others

3  

Sandip Todkar

Others

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
264

नयनरम्य मनमोहक विलोभनीय

चंद्र रुप ते अश्विन शुक्ल पौर्णिमेचे

रात्रीसही शितल प्रकाशझोतांनी धरा झगमगे

टिपूर चांदणे कोजागिरी पौर्णिमेचे


सोळाव्या कलेने पुर्ण होवुनी

शुभ्र शितल तेजस्वी चंद्रमा नभी

पृथ्वीस आलिंगन देण्या समीप आली

चांदोबा मामाची शीतल सुंदर छबी


प्रेमीयुगुल अबाल वृद्धांची मने सुखावली

दारावरती नव धान्यांची तोरणे शोभून विसावली

ज्येष्ठ सुपुत्र सुकन्येचे औक्षण करुनी

घरातील कुबेर महालक्ष्मी प्रसन्नतेने स्थिरावली


केशर वेलची बदाम पिस्ते मधु शुभ्र दुधाचा

नैवेद्य अर्पूणी शुभ्र शीतल चंद्रमासी

करिती सकल तो प्रसाद ग्रहण प्रेमाने

औषधी टिपोरे चांदणे कोजागिरी पौर्णिमेसी


दर्शन चंद्राचे शुभ्र दुधात घेऊन

निहाळती रुप शितल शुभ्र सुंदर

जीवनात जरी आले लाखो काळे ढग जरी

तुजसम चंद्रमा लखलखू दे छबी आमुची जगभर


Rate this content
Log in