अप्सरा
अप्सरा


हृदयमंदिरी बसली आहे
माझ्या एक अप्सरा
सौंदर्य जरी साधे सरळ साजिरे
परी चंद्रासम मुखडा
नित्य नवीनतम दिसते
गोजिरवाणे रुप तुझीये सखे
पेहराव जरी साधा
परी कांतीत मनमोहकतेचे धुके
स्वभावात ही शितलता
वाणीतून अमृत बरसे
नाजुक कमनीय बांधा
जणू मदनाची पुतळी दिसे
किती सावरु मनाला
प्रेमसागराचा बांध हा तुटे
जाणून मज मनाची काहूर ही
का छळतेस मला नटखटे
तुझ्याही मनी मजसाठी प्रीत खरी
सांगतात तव नयन चोरटे
क्षणोक्षणी मग मदनबाण सोडूनी
का घायाळ करतेस मदनिके
हे अप्सरे हे मदनिके
हे मम हृदय मंदिर देवता
नित्य पुजितो आराधितो मी
तुजला नच विसरता