लाँकडाऊन ते अनलाँक
लाँकडाऊन ते अनलाँक
जय जय राम कृष्ण हरी
लाँकडाऊन मूळे चूकली देवा यावर्षी
अखंड चालत आलेली तुझी पायी वारी
जय जय राम कृष्ण हरी
मन मात्र तुझ्या ओढीने
रस्त्यावर चालत होय
भेट तुझी घेण्यासाठी
क्षणक्षण तळमळत होत
तूच भेटलास मग खाकी वर्दीत रस्त्यावरती
जा म्हणालास घरी
जय जय राम कृष्ण हरी
बावीस मार्च पासून देवा देशात
लाँकडाऊन सुरु झालं
सहा महिने झाले अजून
सर्व काही नाही सुरु झालं
चीन घेऊन आला ही बिमारी
या विश्वाच्या दारी
जय जय राम कृष्ण हरी
लाँकडाऊन मध्ये पहिले देवा
कडक होती संचारबंदी
किराणा, भाजीपाला, औषधे
आणण्यासाठी एकच माणूस रस्त्यावरती
सुरु होती फक्त मेडिकल , बँका,किराणा आणि भाजी वाल्यांची
आलटून पालटून फेरी
जय जय राम कृष्ण हरी
ऊद्योगधंदे थांबले देवा
आँफीसं बंद झाली
दळणवळण थांबले सारे देवा
सगळ्या शाळा बंद झाल्या
घरातूनच काम करत होते सारे
आणि शिक्षण आँनलाईन मोबाईल वरी
जय जय राम कृष्ण हरी
हातावर पोट असणारा
गरिब मात्र ठार मेला
कोणी केली आत्महत्या आणि
कोणी अँटकनेच गेला
शास्त्रज्ञ प्रयत्न करतात तरी
अजून पूर्णपणे लस नाही मिळाली
जय जय राम कृष्ण हरी
देवा तुझी देवळं बंद केली गेली
सणवार नाही झाला
गुढीपाडवा, शिमगा होळी,
गोपाळकाला दहिहंडी, गणपती
सारा सणच सूणा गेला
कानी येत होत्या खबरा सग्यासोयरांच्या जाण्याच्य
ा
काय करु पण या लाँकडाऊनमूळे
देवा अखेरची भेट पण नाही झाली
जय जय राम कृष्ण हरी
बंद देवळातून देवा तू वाट आमची पाहत होतास
पोलीस, डॉक्टर, नर्स ,सफाई कर्मचारी, शास्त्रज्ञ
बनून सेवा आमची न थकता करत होतास
आस आहे लवकर मिळेल लस आणि हटेल ही बिमारी
जय जय राम कृष्ण हरी
लाँकडाऊन मध्ये फक्त देवा
आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी
शेतकरी शेतात राबत होता
आणि देशाचे रक्षण करण्यासाठी
सीमेवर जवान जीव गमावत होता
आम्ही होऊन हतबल
रडत होतो सारी
जय जय राम कृष्ण हरी
आता देवा हळूहळू अनलाँक
होतय सर्व
रोजीरोटीचा सुटतोय मोठा प्रश्न
दोन घास मिळतायेत पोटाला हक्काचे
दुर होतेय हळूहळू बेकारी
जय जय राम कृष्ण हरी
देवा यंदा पोरीचं लग्न होत ठरलं
हौशेन करीन विदा पोरीला मनी होत ठरवलं
हौस नाही पूरली तिची पन्नास जणांच्याच आर्शिवादानंच
गेली माझी लेक भरल्या डोळ्यानं सासरच्या घरी
जय जय राम कृष्ण हरी
सुरु होत आहेत आता कार्यालय, कारखाने,ऊद्योगधंदे
दळणवळणाची फिरत आहेत चाके
अर्थव्यवस्थेला येतील दिवस चांगले
खंत हिच लवकर मिळूदे देवा
कोरानावर लस एक गुणकारी
जय जय राम कृष्ण हरी
देवा असा हा लाँकडाऊन ते अनलाँक चा जीवघेणा काळ
येवू दे नको परत
आमच्या जीवणाच्या दारी
सणवार सगळे साजरे करुन
सग्यासोयरांसोबत दर्शनासाठी
पुढच्या वर्षी हसत करूदे तुझी वारी
जय जय राम कृष्ण हरी