आई
आई


आई गेलीस कोठे
पोरका मला करुन
दुःखाच्या तावडीत
लेकरु तुझे सोडून
दिवाण झाला सुना
सुनी ही आंगणवेल
खुर्चीत बसूनी कोणी
माझी ही वाट पाहील
बाबा अजुनी नाही आला
झाली जरी ही वेळ
विचारुन तीला सारखे
कोण लावाया लावील फोन
पोटभर देत जा गे डबा
तीला ओरडून सांगेल कोण
आवडीचे माझे पदार्थ
बनवून देईल कोण
दारात तुला पाहता
क्षीण ओसरे माझ्या कष्टाचा
मिठी तुला मारता
स्वर्गसुख हे ठेंगणे गं
माय माझी ही हरपली
गेला माझा आधार
आता मिठी कुणा मी मारु
आज हात हे पोरके गं
आई माझे गं आई
कोठे गेलीस तू गं
अंधार दाटला भोवती
माझ्या आशेची किरण तू गं
आई गेलीस कोठे
पोरका मला करुन
दुःखाच्या तावडीत
लेकरु तुझे सोडून