STORYMIRROR

Sandip Todkar

Others

3  

Sandip Todkar

Others

शिव शंकर

शिव शंकर

1 min
482

देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी

आराध्य दैवत सकल शिवभक्तांसी

वामांगी जगन्माता ऊमा ऊभी तुमच्या

नमो नमो हे कैलासवासी


जटेत तुमच्या पवित्र गंगा

भोळा सांब म्हणती तुम्हांसी

प्रसन्न तत्काळ तुम्ही त्यावर

जे नित्य मनोभावे भजती तुम्हांसी


कार्तिकेय गणेशाचे तुम्ही हो पिता

जगन्माता सती पार्वतीचे पती परमेश्वर

सत्यम् शिवम् सुंदरम् अखिल जगत

तुम्हीच सर्व कर्ता करविता हे विश्वेश्वर


भक्तीसी भुलूनी देता तुम्ही वर

पाहत नाही कोण असुर कोण सुरेश्वर

निर्दाळवया असुर येता तुम्हीच अवतरोणी

भक्तांच्या कल्याणार्थ तुम्ही रामेश्वर


प्रसिद्ध बारा ज्योर्तिलिंग जगती

असंख्य अगणित रुपे तव धरसी

दुष्टांचा संव्हार धर्माची स्थापना

शिवशंकर हरयुगी अवतरोणी करसी


नमो नमो हे नटेश्वरा

अर्धांगी पार्वती तुझ्या ईश्वरा

घडो तव सेवा या शिवसेवका हातुनी

हिच प्रार्थना तुम्हांला हे जगदीश्वरा


Rate this content
Log in