नाम तुझे घेता देवा
नाम तुझे घेता देवा
1 min
254
हरतो माझा क्षीण सारा
येते अंगी नवे प्राबल्य
नाम तुझे घेता देवा
नांदे सुख शांती कैवल्य
घडी घडी संसाराची
वाहतो ही चिंता
मिळेणा क्षण भजण्या तुला
मनी हिच रे अहंता
मन पळते हे विषयी
आवडतसे मोहमाया
तुला स्मरता मिळते स्थिती
तुझ्या विना जन्म वाया
सावरु मी मजला किती
गुंतवते प्रपंचाची मलीन काया
भजता तुला समाधान चित्ती
विषयवासना जरी येती अडकावया
देहभान हरते माझे
प्राणी पावतो हा विनया
नाम तुझे घेता देवा
गात्रे मोहरती ही ललया
