शाळा
शाळा


जायाचं जायाचं जायाचं
आय मला शाळंला जायाचं...
शाळंत जायाचं अन मला शिकायचं
शिकून शान मोठं मला व्हायचं.....
शाळंला जाइन चार बूकं शिकनं
बाईच्या शिकवण्याकड लक्ष देईनं...
अभ्यास ग्वाड करून मोठा व्हईन...
तुला अन बाला आनंद देईनं...
मायंदाळ पैका मी कमवीनं
गरीबास्नी मी मदत पन करीनं...