सौंदर्य आणि फॅशन
सौंदर्य आणि फॅशन
प्रसाधनाचे लिंपण केले
बाहेरच्या अंगणी
का गं गडे तू हात न घातला
आपुल्या अंतर्मनी
ही तर नुसती फॅशन झाली
आतून का न धुतले
क्षणात टिचरला मात घडा
बिंग कसे फुटले
निसर्गाचा अजोड बांधा
त्वचा तुझी टरकली
कंबर मोडली सँडलने गं
नव्हे का फॅशनची ही वाकुली
सौंदर्याचा घे रेशीमधागा
बांध केसांचा जुडा
सुंदरता घे निसर्गातुनी
वाढवू नको फॅशनचा गं हुडा
