सावली पाठलाग करते
सावली पाठलाग करते
रणरणत्या उन्हांचा ,
सावली पाठलाग करते,
लाहीलाही करता जीवची ,
हळूच त्यास शिवते...
गारवा तो क्षणभर ,
अंगावरून ओघळत जाते,
जणु सुखाची चाहूल,
मनाला भासते ...
सुख दुःखाचा हा खेळ ,
जीवनात रंगते ,
दुःखाच्या मागुनी ,
सुख धावुनी येते ...
कधी उन्हातही चालता ,
प्रेमात पडते,
नको सावली मला ,
उन्हेच भावते ...
उन्हात पोळतांना पाय,
सावली आधार देते,
सोसुन घे थोडे ,
आलिंगणास ती बाहू पसरते ...
रणरणत्या उन्हांचा ,
सावली पाठलाग करते,
लाहीलाही करता जीवची ,
हळूच त्यास शिवते...
