सावधानता पाळा रोगराई टाळा
सावधानता पाळा रोगराई टाळा




घेरलंय या रोगराईनं
सावधानताही पाळा
राखा परिसर स्वच्छ
समूळ रोगराई टाळा
पिण्याचे पाणी घरात
ठेवावे स्वच्छ न् शुद्ध
नका मिसळू रसायने
होईल प्रदूषित अशुद्ध
फळे, भाज्या घ्यावीत
स्वच्छ पाण्याने धुवून
मातीमधील विषाणूही
जाती पाण्याने वाहून
जंक फूड फास्ट फूड
करते रोगांचा भडीमार
अस्वच्छ अन्न खाऊनच
होतो आजारांचा प्रसार
नका खाऊ उघड्यावर
तळलेले हे खाद्यपदार्थ
होईल विषबाधा संसर्ग
रोगी जीवनात नसे अर्थ