सातत्य
सातत्य
नुकत्याच होऊ घातलेल्या बागेत
आज पहिल्यांदा पदार्पण झाले
रविराजने कवाड बाजूस सारून
आम्हास लगेच दर्पण दावले...
म्हंटले इतका कसा उतावीळ तू
जरा चढ तरी चढू दे
थोडा मोकळा श्वास तरी
मला निवांत घेऊ दे...
म्हणतो कसा,काल ढगाआड मी म्हणून
चारचौघात माझा आळस बाहेर काढलास
लोकांच्या नजरेत मला कसा
हिरमुसले बाबा केलास...
म्हंटले मी ही मग
चूक झाली देवा मला माफ कर
चुकीला माफी नाही आता
मुकाट्याने कान धर...
संकल्प कर मनापासून
नित्य नियमाने इथे येशील
नचूकता यापुढे सदैव
नित्य नियमाने हजेरी देशील...
आठवले मला ते पुन्हा
कॉलेज ते दिवस रोलकॉलचे
चौकटीत उभे राहून घाम पुसत
मे आय कम इन म्हणायचे....
नजर भेदक सूड उगवायची
गाडी तिष्ठत उभी रहायची
माना वळलेल्या आम्हा मारायची
वाटायचे ही अवहेलना काय कामाची...
आता मात्र रवी राजा मजा वाटते
तीच सजा हवी हवी वाटते
सातत्य जीवनात यशस्वी बनवते
आठवण तुझी म्हणून नित्य खुणावते...!
