STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

साठीच्या बनात

साठीच्या बनात

1 min
322

साठीच्या वळणावर

मन का गलबलतं

निरोपाचा गहिवर

डोळ्यांत पाणी येतं


आपल्या नवजीवनात 

नवे सुहृद येतात

आधार प्रेमाचा देतात

घेऊन हात हातात.


काटकसर श्रमांना

पूर्णच विसरायचं

प्राधान्य आरामाला

कटुतेला सोडायचं


नातेसंबंधांचा गोफ

नवनवीन विणींचा

कधी आनंद घ्यायचा

जुन्या कँलिडोस्कोपचा


गप्पा नि चेष्टामस्करी

हास्यविनोदी रमायचं

मदतीसाठी सख्यांच्या

चटकन धावायचं


ईश्वरचिंतनी मन

सुखानंदे रमवावे

आयुष्याची सार्थकता

परमार्थातच आहे


इतरांना सुख द्यावे

मन ठेवावे निश्चिंत

निखळतात बंधने

पोचता पैलतीरात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract