साथ हवीय मला, देशील का ?
साथ हवीय मला, देशील का ?
ते बघ तिथे डोंगराच्या पलीकडे
असेल तुझा माझा प्रेमाचा गाव
मिळुनी बांधू या घरटे इवलेसे
अवघाची संसार गोड होईल
विश्वासाच्या अभेद्य भिंती
कष्टानं उभारू घर कौलारू
सुख - दुःख सोबतीण झेलू
अवघाचि संसार सुखाचा करू
आपुल्या प्रेमाची बाग बहरेल दारी
चिली पाले खेळतील अंगणी पहा
थकून बघून येता स्मितहास्य
तुझं अन सोबत घोटभर चहा
तुझं माझं काही वेगळं नसेल
भवसागर हा तरुण जाऊ
साथ माझी तुला असेल परंतु
तुझीही साथ हवीय मला, देशील का ?
