STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

सांग त्यांना

सांग त्यांना

1 min
467


बोलताना वार काहो काय कामा ? सांग त्यांना

आग काही आज नाही काळजाला सांग त्यांना ॥१॥


हात काहो आज खाली चालतांना सांग त्यांना

घोषना का थांबल्या त्या ? शांतता का ? सांग त्यांना ॥२॥


तोडताना झाड पाही आस का ही ? सांग त्यांना

सावलीला पारखा तू आज झाला सांग त्यांना ॥३॥


जात आता आपली तो लावतो का ? सांग त्यांना

वाहतांना त्या रक्ताला लाल पाणी सांग त्यांना ॥४॥


तो झेंडा आता हे काही दाखवीना सांग त्यांना

दांडुका त्याचा पहा तो तोडला ना ? सांग त्यांना ॥५॥


या रंगाचा स्वार्थ राही भांडतांना सांग त्यांना

तो रडीचा डाव होता झोडतांना सांग त्यांना ॥६॥


मी मला का घाबरावा झोपताना सांग त्यांना

आत दाराला कडी नाही कदापी सांग त्यांना ॥७॥


वाहतो मी ओझे डोई भार झाला सांग त्यांना

कोठे सोडावी कर्जाची पोतडी ही ? सांग त्यांना ॥८॥


वाट पाही आपली ती कोण आता ? सांग त्यांना

दूर जाता श्वास होतो कोंडमारा सांग त्यांना ॥९॥


कोण छोटा कोण मोठा वाद नाही सांग त्यांना

ऐकताना कान दयावा साद नाही सांग त्यांना ॥१०॥


होत नाही नाते दूरावा भेटीचा सांग त्यांना

सारे आता व्दार खोला वागताना सांग त्यांना ॥११॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational