STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance Tragedy Others

2  

Arun V Deshpande

Romance Tragedy Others

सांग मी काय करू ?

सांग मी काय करू ?

1 min
14.4K


रहावत नाही तुझ्याविना एकटे मी काय करू ?

धावत्या मनास या माझ्या कसे ग मी आवरू ?।।

जडला जीव तुजवरी ध्यास सखे तुजा जडला

वाटावे तुज हे सारे खरे सांग तू ,मी काय करू ?।।

झगमगले आकाश कसे आाज मस्त चांदण्याने

नसे सोबतीस तू, मी एकटाच कसा ग फिरू ?..।।

क्षण तुझ्यासवेचे विरंगुळा, सुखद आता मनाचा

हरवूनी जातो आठवणींत मन लागे झुरू ..।।

रहावत नाही तुझ्याविना एकटा मी काय करू ?

वाटण्यास तुज हे सारे खरे सांग सखे, मी काय करू ? ।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance