सामर्थ्य लेखणीचे..
सामर्थ्य लेखणीचे..

1 min

171
लेखणी स्वाधीन आहे
सर्वस्वच माणसाचे,
भूत, भविष्य, वर्तमान
जाणतो सामर्थ्य लेखणीचे
जन्मकुंडली, शिक्षण, नोकरी
मृत्यू पत्र या वारसाचे,
ज्ञान, विज्ञान, क्रांती, प्रगती
तत्त्वज्ञान, शास्त्र जीवनाचे
धर्मग्रंथ, वेद, संविधान
न्याय, प्रशासन, संशोधन,
लेखणीरुपी तलवार हाती
रणशिंग फुंकले क्रांतीचे
ज्ञान आहे तिसरा डोळा
अविद्येने अनर्थ केला,
कळले सर्व जगाला
सामर्थ्य लेखणीचे..!