सामंजस्य
सामंजस्य
नको गं पायी तुडवू
भावनेचे कोमल फुल
निर्मल भावना आपल्या
नको करू गं भूल
हृदयी आपुल्या तुझेच रूप
तुझ्या प्रीतीचा मोह खूप
पण कधी करिसी तोल प्रीतीचा?
कधी ठरवशील मोल प्रीतीचा?
ओळख गं क्षणीचं अापुलकीचं नातं
दुराव्याने दोन मनाची दरी वाढतं
कुणाचेच समजण्या पाऊल पुढे
पडत नाही
मग् विस्फोट, घटस्फोटाशिवाय काही
मागे उरत नाही
सावर गं क्षणीच संसार
फुलव गं जीवनी बहार
हृदयातल्या प्रेमरूपी धारेनी
कर नाराजगीचा संहार
एकट्या उदास मनाचे जीवन
जणू काही काटेरी वन
दोन जीवात सामंजस्य असावे
खुलेल फुलेल, बहरेल पुष्प जीवन
