सामान्य
सामान्य


सामान्य माणसाचे सामान्यच प्रश्न
सामान्यच हट्ट जीवनाचा
सामान्य तिकीटबारीवर
सामान्य चित्रपट पाहून जगण्याचा
सामान्य स्वप्नांची सामान्य समाप्ती
सामान्य सकाळ उगवलेली
मनातला कोलाहल न ऐकण्यापत
जोरात नळाची धार सोडलेली
दडपणात प्यायलेला
सामान्य चहा
सामान्य अंघोळ
सामान्य तर्री पोहा
सामान्य चपलेला
सामान्य छिद्र
सामान्य सर्दीच्या
शिंका अभद्र
सामान्य काम
सामान्य अपेक्षा
सामान्य सायंकाळी
सामान्य सिग्नलवर गजऱ्याच्या आशा
सामान्यच रात्र
क्वचित एखादा पेग
सामान्य झोपण्यात
दरदरून आवेग
नंतर नंतर पुन्हा
सारे सामान्यच सामान्य
कपाळावर घाम नि
तळहाती शून्य