साधना कलाकाराची
साधना कलाकाराची
कलाकार साधकच
विद्या कला व्यासंगाचा
तळमळ असे उरी
ध्यास मनी सातत्याचा
गुरुमुखातून विद्या
लक्ष देऊनी घेतसे
खास स्वतःचे घालून
कला शिक्षण घेतसे
गुरुआज्ञा प्रमाणचि
नसे कधीच अवज्ञा
ध्यास कलेचा इतुका
सर्वस्वचि गुरुआज्ञा
नाही कधीच कसूर
साधनेत रियाझात
गुरु कडक शिक्षेत
दया नये साधनेत
कधी खोटे प्रशंसणे
नावडते गुरुलागी
कधी प्रगती करता
वाहवाही मिळे त्यासी
खरा कलावंत असे
जन्मभरी साधकचि
नसे तुलना कोणाशी
स्पर्धा नित्यच स्वतःशी
नाव मोठे मिळविता
लीन सदा गुरुपदी
सर्व तीर्थक्षेत्रे त्याची
सदा कलाध्यासापायी
