STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

रफू...!

रफू...!

1 min
27.6K


आठवी नववीत असताना

रफू माझ्या वाट्याला आला

त्याने चांगलाच माझ्या

बोटांचा कस पाहिला


त्या काळात सुट्टी लागली

की हस्तकला अंगात भिनायची

घरो घरी पिशव्या पडदे

विणकाम भरतकाम दुकान मांडायची


भाताच्या गव्हाच्या काड्या

तापून नवीन रंग घ्यायच्या

त्यातून राधाकृष्णापासून

ते ताजमहालापर्यंत रूप साकारायच्या


त्यातूनच मग हाताना आपोआप

फाटलेल आभाळ दिसायचं

ठिगळ पडलेल भोक मग

हळूच तोंड वर करून हसायचं


वाईट नाही वाटायचं कारण

सर्वांचच नशीब फाटायच

आणि मग फाटलेल नशीब

सुई दोरा घेऊन आम्ही रफू करायचं


खरच रफू करताना

फार मोठं समाधान आणि धन्य वाटायचं

बोटांचा कस लागायचा

आणि पहाता पहाता रफू पूर्ण व्हायचा


मोठ्या कौतुकाची थाप

बचतीमुळे पाठीवर बसायची

आणि तीच रफू पॅन्ट आनंदाने

आम्ही गाव भर मिरवायची


सर्वांचं लक्ष वेधल जायचं

फार फार बर वाटायचं

कारण स्वतः केलेला रफू

हे मोठ्ठ भूषण असायचं.....!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational