रोटी डे
रोटी डे
किती केले डे साजरे
मिटली ना पोटाची आग रे
आता तरी मानवा
तू माणुसकीला जाग रे
रोज डे चॉकलेट डे
सारे डे साजरे होतात
सांगा , हे डे कधी का
पोटाची भूक शमवतात
गुलाब देऊन पोटाची
आग कुठे विझते
खळगी भरण्या पोटाची
भाकरीची गरज असते
भेट , गुलाब देऊन तुला
मिळते का समाधान ?
कधीतरी करून बघा
भुकेल्याला अन्नदान
भुकेल्या मुखी घास भरवून
थोडेतरी पुण्य कर
कुणा निरागस चेहऱ्यावर
आनंदाचे रंग भर
एकदिवस भाकर वाटून
भुकेल्याचे पोट भरू
आता सगळ्या डे सोबत
रोटी डे ही साजरा करु
