रणरणत्या उन्हात
रणरणत्या उन्हात
रणरणत्या उन्हात कोठून तरी यावा एखादा ढगारा,
अंगाला असा हा सुखावून जावा गार गार वारा
जीवाची लाही लाही अन धारा घामाच्या,
दाह करण्या कमी अशा सरी पावसाच्या
होती आशा पल्लवित रुजण्या बीज गर्भात मातीच्या,
स्वप्ने पाहू लागे उद्याची ते किरणांत सूर्याच्या
तुझ्या आठवणीत मन कसे झाले ओलेचिंब,
डबक्यातल्या पाण्यात हे पाहू लागे प्रतिबिंब
