रंगीत आयुष्य
रंगीत आयुष्य
रंगीत आयुष्य
देवाची देणगी,
लाभावे दीर्घायु
एकच मागणी...१
आनंददायक
जगण्याची वृत्ती,
वाढवे आयुष्य
हीच सद्यस्थिती...२
नैराश्य जीवन
आयुष्य घटवे,
ऊर्जा नकारार्थी
मृत्यूस आठवे...३
यशाचे गाठावे
उत्तुंग शिखरे,
पूर्ण करे इच्छा
ठेवून ध्यास रे...४
लावावे मनास
छंद नवे नवे,
जोपासून यास
आयुष्य खुलवे...५
