रंग
रंग
रंग अनेक निसर्गात
रंग अनेक जीवनात
रंग अनेक मनात
थोडेच उतरतात स्वभावात
उधळण छटांची मनमुराद
होते मन उल्लासीत
भेदभाव ना उरत काही
रंगात रंग जेव्हा मिळत
सरावा भेद जाती धर्मातला
वादांना थांरा न मिळो मनाचा
मन मने होवोत एक साऱ्यांची
रंग सारखाच इथूनतिथून रक्ताचा