रंग वसंताचे...
रंग वसंताचे...
या उल्हासाचे रंगीत धारी
रंग वसंताचे हे उधळू चला
नवश्रोताच्या ज्योती लावूनी
भेदभाव हा विसरू चला.....
किल्मिशाच्या या सावल्या
होळीच्या अग्नित टाकू चला
चैतन्याच्या या सागर लाटा
नभांगनी त्या भिरकवू चला..
नव उंमगाच्या नव तरंगाच्या
मैफलीत स्वप्न हे पाहू चला
नव सूर्याची किरणे घेवूनिया
सुविचार जनामनात पेरू चला.
अनेक रंग या जगी असूनी
सत्य नीती अंगीकार करुनी
हास्य छटा फुलवूनी अधरा
सप्तरंगाच्या राशी उधळू चला.
माणुसकीची तऱ्हा ओळखूनी
वेळीच कल्याण करू चला
वसंताच्या या रंगरंगात मनी
असहाय जनांची दखल घेवू चला.
